April 20, 2026 12:35 am

हिंगोली जिल्ह्यात वाईन बार चालकांकडून मनमानी कारभार फक्त फोन करा आणि घरपोच दारू मिळवा

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

 *एमआरपी पेक्षा दाम दुप्पट रक्कम तळीरामाच्या खिशाला कात्री*

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाची पायमल्ली शूल्क विभागाच्या नियमाचे पालन न करता फोन आला की घरपोच मिळते दारू

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हे विदर्भ- मराठवाडा सीमेवर असलेलं शेवटच गाव आहे

येथील सर्व समाजाचे लोक गोण्या गोविंदाने नांदत असतात परंतु येथील सूसंस्कूत गावाला काही वर्षांपूर्वी हैवान राक्षसी लोकांची नजर लागली होती ५० वर्षापासून खुलेआम अवैध दारू विक्री करत दारूच्या नशेत गाव वाहून निघत होता राक्षसी लोकांनी जसा काय गाव संपवण्याचा विडाच हाती घेतला होता या अवैध दारुमुळे गावातील अनेक लोक मरण पावले तर अनेक माय-मावलीचे संसार उध्वस्त झाले सदर या बाबत गावकऱ्यांनी पूढाकार घेत मागील तीन वर्षापासून राक्षसी कृत्य करणारे लोकांच्या विरोधात गावकऱ्यांनी आवाज उठवला आणि गावातली अवैध देशी दारू बंद करून टाकली सदर तीन वर्षापासून गावातलीअवैध देशी दारू बंद झाल्यामुळे कुठेतरी माय- माऊली आणि गावकऱ्यांनी नि:स्वास सोडला होता

सदरील मात्र गावकऱ्यांच्या मेहनतीने केलेल्या अवैध देशी दारू बंदचा फायदा घेत काही वाईन बार मालकांच्या अंगात राक्षसी आत्मा घुसला की काय असं चित्र सध्या पानकनेरगाव मध्ये दिसत आहे पानकनेरगाव येथे सध्या शासन मान्यता असलेले तिन ते चार बियर व तसेच वाईन बार दुकान आहेत मात्र सध्या वाईन बार मालकांकडून सध्या राजरोसपणे खुलेआम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाची पायमल्ली करत मनमानी कारभार सुरू आहे परवानधारकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा चित्र पहायला मिळत आहे

काही ठिकाणी तर बार मालकांनी वेळेचे बंधन न पाळता सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा घेण्याच्या वेळेला दारू विक्रीचा कार्यक्रम सुरू होतो तर काही ठिकाणी दुकानदार ग्राहकाकडून मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे उकळत असल्याचा प्रकार सूद्धा घडत आहे त्यामुळे तळी रामाच्या खिशाला कात्री लावली जाते 

‘अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो’असे म्हणत मोठी रक्कम देऊन खरेदी करण्याची वेळ तळीरामावर आली आहे

तर एवढच नव्हे गिर्हाईकांचा फोन आला की मुलांचं वय न बघता २१ वर्ष आतील जूगार अड्डे,गल्लीबोळ,व तसेच घरपोच पार्सल डिलिव्हरी करण्याचा खुलेआम धक्कादायक प्रकार दूकानदाराकडून घडत आहे

शासकीय सुट्टी असली तरी वाईन बार चे शेटर नावापूरतेच बंद मात्र मागच्या दाराने दारू सुरू असल्याची उघड्या डोळ्यांनी गावकरी पाहत असतात शासनाच्या नियमाचे सरास उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे*

वाईन बार मालकांच्या राक्षसी कृत्यामुळे लहान मुले व्यसनाधीन होताना दिसत आहेत व तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांनी यावर अंकुश ठेवून त्यांच्या कडक कारवाई करत शासनाच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या वाईन बार धारकांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी सध्या गावकऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें