April 20, 2026 12:33 am

वार्ड क्रमांक चार मध्ये सांडपाण्याची व्यवस्थित व्यवस्था नाही.

प्रतिनिधी सुधाकर डुकरे कनेरगाव ना.

कनेरगाव नाका:– हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका हे एक गट ग्रामपंचायत आहे यामध्ये पाच वार्ड आहेत कनेरगाव मोप मिळून पाच वार्डामध्ये ग्रामपंचायत निवडणुका होत असतात त्यामध्ये वार्ड क्रमांक चार या परिसरातील घरमालकांना तसेच वसाहत मध्ये राहणाऱ्या लोकांना सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे घाणीचे तसेच रोगराईच्या सामना करावे लागत आहे याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार राहील, वार्ड क्रमांक चार मधील मधुकर गणपत गावंडे यांनी घर बांधले त्यामध्ये स्वतः 25000 खर्च करून अंडरग्राउंड पाईपलाईन केली परंतु त्या पाईपलाईनचा त्यांना जास्त फायदा झाला नाही .कारण आमदार निधीतून (सिमेंट) आरसीसी रस्ता त्यांच्या कॉलनीमध्ये मंजूर झाला परंतु ग्रामपंचायत च्या हलगर्जीपणामुळे त्या रस्त्याच्या सोबत नाल्या काढणे अनिवार्य होते परंतु रस्त्याच्या दुतर्फा नाली नसल्यामुळे सर्व कॉलनीतील घराचे पाणी रस्त्यावरून वाहत जाऊन आजूबाजूला राहणाऱ्या सर्व लोकांना त्याचा अतोनात त्रास होत आहे व त्यामुळे रोगराई सुद्धा पसरत आहे. ग्रामपंचायतला 18 नोव्हेंबर रोजी मधुकर गणपत गावंडे यांनी अर्ज सुद्धा दिला होता त्यानुसार ग्रामपंचायतीने पुढील कार्यवाही करणे अनिवार्य होते .परंतु ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक व सरपंच हे कुठलेही ठोस पाऊल उचलत नसल्यामुळे त्या कॉलनीतील रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे कॉलनीतील अजून बऱ्याच लोकांनी ग्रामपंचायतला अर्ज देऊन तोंडी सांगून अंडरग्राउंड पाईपलाईन तसेच नाली ही व्यवस्था करून आमच्या सांडपाण्याचा प्रश्न सोडवावा अशी विनंती सुद्धा ग्रामपंचायतला त्यांनी केली आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें